बारामती -जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस देईन. जी कामगार महिला गुणरत्न सदावर्तेच्या ( Gunaratna Sadavarte Case ) हातात बांगड्या भरेल तिला मी ५ लाख रुपयांचे बक्षीस देईन, अशी घोषणा बारामती टेक्स्टाईल पार्कचे कामगार ( Trade union of Baramati Textile Park ) तुकाराम चौधर यांनी केली आहे. बारामती एमआयडीसीमध्ये रविवारी (आज) विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे शरद पवार ( Sharad Pawar house attacked ) यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध ( Workers front ) केला. यावेळी ते म्हणाले.
Sharad Pawar House Attacked Case : गुणरत्न सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखाचे बक्षिस देणार - कामगार संघटना
जी कामगार महिला गुणरत्न सदावर्तेच्या ( Gunaratna Sadavarte Case ) हातात बांगड्या भरेल तिला मी ५ लाख रुपयांचे बक्षीस देईन, अशी घोषणा बारामती टेक्स्टाईल पार्कचे कामगार ( Trade union of Baramati Textile Park ) तुकाराम चौधर यांनी केली आहे. बारामती एमआयडीसीमध्ये रविवारी (आज) विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे शरद पवार ( Sharad Pawar house attacked ) यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध ( Workers front ) केला. यावेळी ते म्हणाले.
सदावर्ते हा माणूस विविध कामगार संघटनांमध्ये शिरून कामगारांना पुढे संकट निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामधूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. 12 एप्रिल रोजी सदावर्ते म्हणाले होते, बारामतीमध्ये पवारांच्या घरासमोर आंदोलन करू. मात्र सदावर्ते व त्यांच्या मनोवृत्तीच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो बारा तुम्ही बारामतीमध्ये येऊन तर पाहा आम्ही त्यांची वाटच पाहत आहोत, असा इशारा देखील यावेळी कामगारांनी दिला आहे. या निषेध रॅली विविध कामगार संघटना आणि बारामती तालुका अंगणवाडी संघटनाचे पदाधिकारी व कामगार सहभागी झाले होते.
हेही वाचा -Sanjay Raut : 'रामनवमीला झालेले हल्ले मोठं षड्यंत्र'