पुणे -येथील जम्बो कोविड रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. 16 डिसें.) आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
आंदोलन करत असलेल्या कंत्राटी परिचारिकांना मागील तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. या शिवाय सर्वांना कामावर घेताना जो पगार सांगितला होता. त्यापेक्षा निम्मा पगार या कर्मचाऱ्यांना देण्यात येत होता. म्हणून या कर्मचाऱ्यांनी आज (दि. 16 डिसें.) जम्बो रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडला.
पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार
या रुग्णालयात काम करण्यासाठी कर्नाटक राज्यातून आलेल्या सविता पवार यांनी सांगितले की, याठिकाणी कामावर घेताना आम्हाला 35 हजार रुपये पगार देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण, देताना निम्माच पगार दिला जात आहे. वेगवेगळी कारणे सांगून आमचे पगार रखडवले जातात. मागील तीन महिन्यांपासून तर आम्हाला पगाराचे एक रुपयेही देण्यात आले नाही. दिवाळीचा बोनसही आम्हाला देण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्हाला पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेलणार असल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा -'रिलायन्स भवन'वर मोर्चा काढून अंबानींना जाब विचारणार : राजू शेट्टी
हेही वाचा -पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात, 8 वाहनांचे नुकसान