महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकणमध्ये कामगारांच्या आरोग्य तपासणीला तुंबळ गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

घरी जाण्याच्या घाईमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईबाबत कामगार आपली जबाबदारी विसरल्याचे दिसून आले. तपासणी केंद्रात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे तीने तेरा झाले.

workers health checkup chakan
तपासणी केंद्रासमोर झालेली गर्दी

By

Published : May 5, 2020, 6:04 PM IST

पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आधी आरोग्य चाचणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविने गरजेचे आहे. यासाठी चाकण औद्योगिक परिसरामध्ये आरोग्य तपासणी केंद्राची व्यवस्था आहे. मात्र, कामगारांनी या तपासणी केंद्रात गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

तपासणी केंद्रात गर्दी होऊनही समूह संसर्गाची भीती न बाळगता आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना दिसून येत होते. मात्र, घरी जाण्याच्या घाईमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईबाबत कामगार आपली जबाबदारी विसरल्याचे दिसून आले. तपासणी केंद्रात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे तीने तेरा झाले.

हेही वाचा-गावाची ओढ..! पुण्यात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details