पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पिंपरी-चिंचवड येथून आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनाकडून या कंपनीची तपासणी करण्यात आली असून तातडीच्या उपाययोजना सुरू आहेत. या कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने क्वारंटाईन केले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी केली असून अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
चाकण औद्योगिक वसाहतीत कामगाराला कोरोनाची लागण; संपर्कातील कामगार क्वारंटाईन
चाकण औद्योगिक वसाहतील कंपन्या काही अटींवर सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. या दरम्यान खराबवाडी येथील एका नामवंत कंपनीत काम करणाऱया कामगार तरुणाला कोरोनाची लागण झाली.
चाकण औद्योगिक वसाहतील कंपन्या काही अटींवर सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. खराबवाडी येथील एका नामवंत कंपनीत काम करणाऱया कामगार तरुणाला कोरोनाची लागण झाली. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास आधिकारी अजय जोशी, आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे, सभापती अंकुश राक्षे यांनी कंपनीची पाहणी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. याच परिसरातील कामगार चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कंपनी व्यवस्थापनाने रेड झोनमधील कामगारांना कंपनीत कामावर घेऊ नये, असे आदेश तहसिलदार सुचित्रा आमले यांनी दिले आहे.