पुणे - विहिरीचे खोलीकरण व विहिरीचे बांधकाम सुरू असताना विहिरीच्या कठाड्यावरील मातीची धडी कोसळून पाच मजूर अडकल्याची घटना रविवारी दुपारी खेड तालुक्यातील बहुळ येथे घडली. या घटनेत एका मजुराचा मातीच्या ढिगाऱयाखाली गुदमरुन मृत्यू झाला आहे. निलेश असे कामगाराचे नाव आहे.
ढिगाऱयाखाली गुदमरुन कामगाराचा मृत्यू, पुण्याच्या खेड तालुक्यातील घटना - pune
खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीत शेताच्या बाजुला असणाऱया विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते. विहिरीचे अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरू असताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली.
खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीत शेताच्या बाजुला असणाऱया विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते. विहिरीचे अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरू असताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली. त्यावेळी विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले.
त्यामध्ये चार जणांना वाचविण्यात यश मिळाले. मात्र, एका कामगाराचा मातीच्या डिगाऱयाखाली श्वास गुदमरल्याने तो बेशुद्ध झाला. त्यांना चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.