महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक महिला दिन : महिलांचा कायमस्वरुपी सन्मान राखण्याची गरज - पुण्यात वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 'वाडेश्वर कट्ट्या'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन

By

Published : Mar 8, 2020, 12:35 PM IST

पुणे - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 'वाडेश्वर कट्ट्या'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री संस्कृती बालगुडे, बँकिंग क्षेत्रातील सुनीता यादव, वैद्यकीय क्षेत्रातील जयश्री तोडकर, कामगार क्षेत्रातील मुक्ता मनोहर, महिलांसाठी काम करणाऱ्या तेजस्विनी सेवेकर, माध्यम क्षेत्रातील प्रतिभा चंद्रन यांनी यावेळी हजेरी लावली. हा मान सन्मान केवळ एकच दिवस न राहता महिलांचा सन्मान कायमस्वरुपी राखण्याची गरज व्यक्त करण्यात आली. याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गजानन शिंदे यांनी...

जागतिक महिला दिन

ABOUT THE AUTHOR

...view details