पुणे : अमृता फडणवीस यांनी राष्ट्रपिता आणि राष्ट्रविक्रेता यातील फरक जाणून घेतला पाहिजे, असे म्हणत काॅंग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. तसेच, महिला काॅंग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात ( Womens Congress Aggressive Against Amrita Fadnavis ) आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे काय योगदान होते, याबाबत खरंच अमृता फडणवीस यांना अभ्यास आहे का. त्यांनी त्यांची वाणी त्यांच्या जवळच ठेवली ( Amruta Fadnavis Against Demonstration Protest at Pune ) पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास नसताना कॅमेरासमोर ( Agitation by Womens Congress in Pune ) बोलू नये, अशी टीका यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.
आंदोलना मोठ्या प्रमाणात महिला सहभागी :यावेळी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात 'महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं माझं ठाम मत आहे. असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली. काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी सुद्धा अमृता फडणवीस यांचा तिखट भाषेत चांगलंच समाचार घेतला आहे.