रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अडकलेल्या कामगार तरुणी संकटात; पगार मिळेनात खायचं काय? - पुणे कोविड १९
लॉकडाऊननंतर कामगारांना आपल्या मुळगावी परत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मागील दोन महिन्याचे पगार मिळाले नसल्याने गावाला जायचं कसं असा गंभीर प्रश्न या कामगार मुलींसमोर उभा आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अडकलेल्या कामगार तरुणी संकटात; पगार मिळेनात खायचं काय?
पुणे - रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे खायला अन्न मिळत नसल्याने कामगारांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. तर विदर्भातील बॅचलर कामगार तरुणी वेगळ्याच संकटात सापडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही पगार मिळत नाही गावाला जायचं कसं? असा प्रश्न सध्या या तरुणींसमोर उभे आहेत.