बारामती -बारामतीच्या मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या रत्नाकर बँकेसमोरील वीजवितरण कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या दरवाजाची चोरी करताना दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा प्रकारच्या भुरट्या चोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील नागरिकांच्या घराबाहेर असणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू, तसेच दुकानाच्या समोरील वस्तू चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. अशा भुरट्या चोर्या करणार्या महिलांना सजग नागरिकांकडून हटकले असता त्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे पोलिसांनीच आता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी