पुणे - कधी काळी रेल्वे चालक, गार्ड, डब्बे जोडण्याचे काम असो किंवा सिग्नल यंत्रणा हाताळणे अशा जबाबदारीच्या कामावर पुरुषांचीच मक्तेदारी होती. मात्र, आता ही मक्तेदारी महिला मोडत असून रेल्वेतल्या या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी त्या स्वीकारत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महिला दिनानिमित्त 'डेक्कन क्वीन'च्या संचालनाची सर्व जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांवर - occasion
महिलांच्या या कामाची नोंद घेण्यासाठी महिलादिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने अनोखा उपक्रम राबवला आहे. 'डेक्कन क्वीन' या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या रेल्वेच्या संकलनाची सर्व जबाबदारी महिला दिनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.
महिलांच्या या कामाची नोंद घेण्यासाठी महिलादिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेने अनोखा उपक्रम राबवला आहे. 'डेक्कन क्वीन' या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या रेल्वेच्या संकलनाची सर्व जबाबदारी महिला दिनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. शुक्रवारी पुण्यातून निघालेल्या डेक्कन क्वीनमध्ये राधा चलवादी या मुख्य गार्ड म्हणून काम पाहत होत्या.
रेल्वेत सध्या केवळ ५ महिला गार्ड कार्यरत असून राधा चलवादी या पुणे विभागातील पहिल्या महिला गार्ड आहेत. तर यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे जयश्री कांबळे व श्रद्धा तांबे या लोको पायलटनी डेक्कन क्वीन चालविण्याचे काम केले. याबरोबरच तिकिट तपासनीस म्हणूनही पुणे स्टेशन विभागातील महिला गाडीत होत्या तसेच रेल्वे पोलीस फोर्सच्या (RPF) महिलाकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती.