पुणे - बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय हे महिला व बालकांसाठी 'संजीवनी' ठरत आहे. कोरोना काळातही मागील दीड वर्षांपासून शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना बीसीजी, ओपीव्ही, एचबीव्ही, पेंटा, रोटा आदी आवश्यक अशा तब्बल २५ हजार लसी बालकांना देण्यात आल्या आहेत.
बारामतीच्या महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात २५ हजार बालकांचे लसीकरण - मुलांचे लसीकरण लेटेस्ट न्यूज
कोरोना संक्रमण काळात महिला शासकीय रुग्णालयामार्फत गरोदर माता व बालकांचे नियमित लसीकरण मोहीम अविरत सुरू आहे. या रुग्णालयात बारामती शहर व तालुक्यासह इंदापूर, दौंड, पुरंदर, जेजुरी आदी भागातील गरोदर मातांची नैसर्गिक व सिजरियन अशा दहा हजारांहून अधिक यशस्वी प्रसूती करण्यात आल्या आहेत.

या रुग्णालयावर उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची देखरेख असते. बारामतीसह परिसरातील गरजूंची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील असतात. रुग्णालयाला आवश्यक असणारी सर्व साधन सामग्री तात्काळ पुरवतात. या रुग्णालयात चांगली सेवा दिली जात असल्यामुळे नागरिकांकडून रुग्णालयाचे कौतुक केले जात आहे.
कोरोना काळातील बालकांचे लसीकरण
( 0 ते 5 वयोगटातील बालक )
बीसीजी ५५३०
ओपीव्ही ५५९०
एचबीव्ही ६२४०
पेंटा २१२३
रोटा २१२३
आयपीव्ही १३५२
एमआर १०३०
डीपीटी ९९०