पुणे :महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये राज्यातील महिलांना एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्याची अंमलबजावणी विषयी टीका होत होती. या संदर्भात राज्य सरकारने काल जीआर काढून ही सवलत आज पासून महाराष्ट्राच्या सर्वच एसटी डेपो बस स्थानकामध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
महिलांना 50% तिकीट दरात सुट : त्यामुळे आज पासून महाराष्ट्रात कुठेही महिलांना फिरण्यासाठी 50% तिकीट दराने त्यांना प्रवास करता येणार आहे. या निर्णयाचे महिला वर्गातून स्वागत होत असून विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार महिलांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. महिलांसाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो तसेच सरकारचेही अभिनंदन करतो अशा प्रतिक्रिया आता महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.
आजपासून अंमलबजावणी :पुण्यातील स्वारगेट बसल्याचे व्यवस्थापनानेसुद्धा हा जीआर रात्री प्राप्त झाला असून त्यानुसार आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे. निर्णयामुळे राज्य सरकारचा महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होताना दिसत आहे. भूषण सूर्यवंशी यावेळी म्हणाले की, सर्व महिलांनी या सवलतीचा फायदा घेऊन एसटीमधून जास्तीत जास्त प्रवास करावा असे अवाहन करण्यात आले आहे.