पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ वर्षीय महिलेचा तर पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी,भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणी आणि महिलेचा विनयभंग - nikhil aadag
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ वर्षीय महिलेचा तर पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपींविरूद्ध गुन्ही दाखले करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत भोसरी परिसरातील चक्रपाणी वसाहत येथील एका ४५ वर्षीय महिलेचा टवाळखोर आरोपींनी विनयभंग केला आहे. फिर्यादी ४५ वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुली तसेच इतर एक महिला सौचालयाहून परत येत होत्या. तेव्हा, टवाळखोर आरोपी यांनी शिट्ट्या वाजवून चलो हमारे साथ मजा करेंगे, असे अश्लील बोलून फिर्यादी यांच्या मुलींचा आणि त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी निखिल आदग याला जेरबंद केले आहे, तर अन्य तिघे जण फरार आहेत. अजय माने, राम पुजारी आणि निखिल आदग अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तर दुसऱ्या घटनेत सार्वजनिक सौचालयास जात असताना एका १८ वर्षीय तरुणीला अडवून तू मला खूप आवडतेस माझ्या बरोबर फिरायला चल, माझ्याकडे खूप पैसे आहे, असे म्हणून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून विनयभंग केला आहे. या घटने प्रकरणी १८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी शशिकांत आशिष गायकवाड यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या फरार आहे.