बारामती :भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक ( Hit the bike from behind ) दिल्याने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ( teacher died after being hit by a bike ) घटना माळेगाव निरा रस्त्यावर घडली. माळेगाव बुद्रूक येथील ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षिका संगीता संपत नारगे (रा. कारभारीनगर, कसबा, बारामती)
असे अपघातात निधन झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
Nira Baramati Accident : टेम्पोने दिलेल्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू - Nira Baramati accident
भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक ( Hit the bike from behind ) दिल्याने शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ( teacher died after being hit by a bike ) घटना माळेगाव निरा रस्त्यावर घडली.
![Nira Baramati Accident : टेम्पोने दिलेल्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू speeding tempo hit her bike](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16665406-540-16665406-1665940210038.jpg)
निरा- बारामती रस्त्यावर हा अपघात - शनिवारी (दि. १५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माळेगाव येथे निरा- बारामती रस्त्यावर हा अपघात घडला. फिर्यादी संपत मारुती नारगे यांनी टेम्पोचालक किरण आनंद पाटील (रा.अवधान,जि. धुळे) याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलीस ठाण्याच्या जवळच हा झाला होता.त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अपघाती शिक्षिकेला उपचारांसाठी बारामतीत हलविण्यात आले.मात्र, प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले नाही.
शनिवारी त्या दुचाकीवरून (एम.एच १२ एस -एच ९७२२) बारामतीच्या दिशेने घरी येत असताना माळेगाव येथील मुथा पेट्रोल पंपाजवळील स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो (एम.एच १८ बी.जी ८६९०) वरील चालक किरण आनंद पाटील याने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यातच शिक्षिका संगीता नारगे यांचा मृत्यू झाला. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.