महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'प्लीज प्लीज मला एक किस द्या ना!' अस बोलून पुण्यात वयोवृद्ध नागरिकाकडून महिलेचा विनयभंग - एक किस द्या

Molestation with women : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात विविध गुन्ह्यात वाढ होत आहे. पुण्यातील घोले रोड येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका वयोवृद्ध नागरिकाकडून महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे.

Woman molested by senior citizen in Pune
वयोवृद्ध नागरिकाकडून महिलेचा विनयभंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 1:11 PM IST

Updated : Dec 19, 2023, 1:19 PM IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस

पुणे : Molestation with women : पुणे शहरात कामावर असतानाच सहकारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालयात घडली आहे. याबाबत राजीव विनायक दिवेकर वय 72 वर्ष अशा या वयोवृद्ध व्यक्तिविरोधात डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


'एक किस दे' अस म्हणू लागला : याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे कामावर असताना आरोपी वयोवृध्द माणूस हा फिर्यादी यांच्या टेबल जवळ आला आणि त्यानं ओढून एक किस दे अस म्हणू लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास नकार दिला असता प्लीज प्लीज मला एक किस द्या ना असं बोलून तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ असं सांगत बळजबरी केली. याबाबत डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस म्हणाले की "फिर्यादी महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे काम करत असताना तिथले सचिव आरोपी यांनी त्यांना 'तू मला आवडते पप्पी दे' असं सांगत अश्लील वर्तन केलं त्याबाबत डेक्कन पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे."

मुंबईत देखील घडला होता असा प्रकार : स्कूल व्हॅन चालकानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात समोर आली होती. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला अटक केली होती. तसंच टिळक नगर पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅन चालकाविरोधात बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळं पालकांमध्ये मात्र घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता वृद्धानंच वस्तुसंग्रहालयात असा प्रकार केल्यानं विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत.

हेही वाचा :

  1. Molestation Case : धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग; नराधमाला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. Daughter in law molestation Case: सुनेशी लगट करत सासरा करायचा विनयभंग, तर पतीचेही परस्त्रीशी संबध, पीडितेची पोलिसात धाव
  3. Mumbai Crime News : स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा निर्जनस्थळी विनयभंग, नराधमाला बेड्या
Last Updated : Dec 19, 2023, 1:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details