महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Crime In Pune : प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला 14 वर्षांनी अटक; राहायचा नाव बदलून

प्रेयसीच अपहरण करून निर्घूण हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली ( Woman Kidnapped And Brutally Murdered ) आहे. आरोपीचे आधीच लग्न झाले होते. आरोपी 14 वर्ष नाव बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

Crime In Pune
प्रेयसीची हत्या करणारा आरोपी अटकेत

By

Published : Dec 25, 2022, 9:42 AM IST

प्रेयसीची हत्या करणारा आरोपी अटकेत

पिंपरी- चिंचवड ( पुणे ) :प्रेयसीच अपहरण करून निर्घृण हत्या करत पसार झालेल्या आरोपीला 14 वर्षांनी बेड्या ठोकण्यात आल्या ( Woman Kidnapped And Brutally Murdered ) आहेत. गेल्या 14 वर्षांपासून आरोपी आप्पा गोमाजी मोहिते हा पिंपरी- चिंचवड पोलिसांना गुंगारा देत ( Cheating Police By Change Name )होता. अखेर त्याला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. प्रेयसीकडून होण्याऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आरोपीने तिचा खून केला.

लग्नाचा तगादा :हत्या करण्यात आलेल्या महिलेचे आरोपी आप्पासोबत अनैतिक संबंध होते. तीचे आप्पावर प्रेम होते. तू माझ्याशी लग्न कर, तुझ्या पत्नीला घटस्फोट दे अन्यथा तुझ्यावर मी बलात्काचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी आप्पाला प्रेयसिने दिली ( Extramarital Affair of Man with Another Woman ) होती. याच कारणावरून आरोपीने प्रेयसीचे अपहरण करून हत्या केली. असे पोलिसांच्या चौकशीत उजेडात आले आहे.

नाव बदलून पोलिसांना गुंगारा :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार असलेल्या आप्पा मोहितेच त्याच्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध होते. ती लग्नसाठी तगादा लावत होती. तू तुझ्या पत्नीला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर अस म्हणायची, तस न केल्यास मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकीही तिने आप्पाला दिली ( Extramarital Affair ) होती. याच कारणावरून 21 एप्रिल 2008 रोजी प्रेयसीच अपहरण करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आप्पा पसार झाला होता. कधी बारामती, सातारा या परिसरात तो नाव बदलून राहात पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता. 14 वर्षांनी तो पुण्यातील वाकी परिसरात राहात असल्याची माहिती पोलिस सूत्रांना ( Pune Police Arrested Accused After 14 Years ) मिळाली.

अनेक गुन्हे दाखल : तो चाकण एमआयडीसी परिसरात मिळेल ते काम करून पोट भरत होता. आरोपी आप्पाला वाकी येथून पकडण्यात आले. तो कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण टोळीचा सदस्य होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details