महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाच घेणाऱ्या महिला न्यायाधिशाला अटक झाल्यामुळे खळबळ - लाच घेणाऱ्या महिला न्यायाधिशाला अटक

फौजदारी खटला मॅनेज करुन देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या महिला न्यायाधिशाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अर्चना दीपक जतकर असे लाचखोर महिला न्यायाधिशाचे नाव आहे. यामुळे मावळ परिसरात खळबळ उडाली आहे.

Judge arrested for taking bribe
न्यायाधिशाला अटक झाल्यामुळे खळबळ

By

Published : Apr 1, 2021, 8:03 PM IST

मावळ - न्यायालयात सुरु असलेला फौजदारी खटला मॅनेज करुन देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या महिला न्यायाधिशाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अर्चना दीपक जतकर असे लाचखोर महिला न्यायाधिशाचे नाव आहे. जतकर यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - चार महिन्यांत ७ लाख घरकुलांचे बांधकाम - हसन मुश्रीफ

एका मध्यस्त महिलेच्या माध्यमातून, या महिला न्यायाधीशाने ५० हजार लाच स्वीकारली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता.१३ जानेवारीला पुण्याजवळील किवळे येथे लाचलुचपत विभागाने कारवाई करत शुभावरी गायकवाड या एजंटला अटक केली होती. तसेच या प्रकरणात यापूर्वी निलंबित पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव याला अटक केलेली आहे.

हेही वाचा - मुंबईत जुगार अड्ड्यावर 'एनआयए'चा छापा, मॅनेजरची चौकशी सुरु

शुभावरी गायकवाड हिला अटक केली त्यावेळी झालेल्या तपासात जतकर यांचा यात सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे जतकर यांना आज अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान एका न्यायाधिशालाच अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details