महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मृत्यू - कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यातील एका कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते.

woman dies due to corona in pimpri chinchwad
पुण्यातील महिलेचा करोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मृत्यू

By

Published : May 6, 2020, 4:13 PM IST

पुणे - दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई आणि पुण्यात हे प्रमाण जास्त आहे. आज (बुधवार) पुण्यातील एका कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूची एकूण संख्या ६ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज शहरात ८ जण कोरोनाबाधित आढळले असून यात बहुतांश तरुणांचा समावेश आहे.

पुण्यातील महिलेचा करोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १४२ कोरोनाबाधितांची संख्या झाली असून, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जण पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेरील आहेत. दरम्यान, ६२ जणांना महानगर पालिकेच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ते सर्व ठणठणीत बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण हे मोशी, पिंपळे गुरव आणि चिंचवड परिसरातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपळे गुरव, मोशी या परिसरात रुग्ण आढळत असल्याने येथील काही परिसर सील करण्यात आलेला आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींचे वय हे २१, २३, २४, २५, २८, ५० आहे तर महिलांचे २५ आणि २८ असे आहे. आज आढळेल्या कोरोना रुग्णांमध्ये तरुण व्यक्तींचा जास्त समावेश असल्याने तरुणांनी खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर घरी राहणे गरजेचे असून, महत्त्वाचे काही काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details