शिरूर (पुणे) - तालुक्यातील वडगाव रासाई येथे विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला. वर्षा लक्ष्मण भगत असे तरुणीचे नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली.
मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू - शिरूर बातम्या
विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला.

शिरूर पुणे
सध्या कॉलेज बंद असल्यामुळे ती कुटुंबाला मदत करत होती. तिच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाची आई विमल भगत यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
शिरूर पोलीस व स्थानिकांच्या मदतीने वर्षाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढुन शवविच्छेनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.