बारामती - बारामती येथे महिलेच्या तक्रारीवरून पाच सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Woman Complaint Filed Against Five Lenders ) आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून, बारामती सत्र न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली ( Baramati Session Court Custody Lenders ) आहे. संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी ( रा. बारामती ) व अळणुरे ( रा. परभणी ) अशी गुन्हा दाखल केलेल्या सावकारांची नावे आहेत.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती बबन सातपुते ( रा. रिया आपारमेंट भिगवन रोड बारामती ) यांनी २०२१ मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू करताना तिच्या पतीने संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी व अळणुरे या सावकारांकडून दर महिना पाच टक्के व्याजाने एक करोड नऊ लाख रुपये घेतले होते. या सर्वांची बरीचशी रक्कम व्याजासहित कारखाना सुरू असताना परत केली आहे. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला ३ मे २०२१ ला आग लागली आणि त्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाकीची रक्कम ते परत देऊ शकले नाही. त्यानंतर वरील सर्व सावकारांनी त्यांना व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली.