पुणे - लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या नऊ महिन्याच्या चिमुकलीसह धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी रात्री ही घटना घडली. शीतल देवराम मखवाने (वय 27) आणि शुभ्र (वय 9 महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मृत महिलेचे मामा विजय रामचंद्र साळुंखे (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे.
नऊ महिन्याच्या मुलीसह रेल्वेखाली उडी घेऊन महिलेची लोणीत आत्महत्या - loni kalbhor news
शीतल देवराम मखवाने (वय 27) आणि शुभ्र (वय 9 महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मृत महिलेचे मामा विजय रामचंद्र साळुंखे (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की मृत शीतल यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी झाला आहे. त्यांना चार मुली आहेत. मागील काही महिन्यांपासून शीतल या मुलगी शुभ्रासह लोणी काळभोर येथे आजीसोबत राहत होत्या. दरम्यान, सोमवारी रात्री लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-दौंड रेल्वेमार्गावर या दोघी मायलेकी यांचे मृतदेह आढळले आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहे.