पुणे - घनदाट जंगलामध्ये रुबाबदारपणे फिरणारा बिबट्या आता शिकारीच्या शोधात लोकवस्ती येऊन वास्तव्य करू लागला आहे. अशातच बिबट्याचे लोकवस्तीत वास्तव्य वाढत असताना बिबट्या व मनुष्य यांच्यात एक वेगळा संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून बिबट्या संकटात सापडत चालला आहे. अपघात, दुर्दैवी मृत्यू अशा अनेक संकटांचा सामना बिबट्याला करावा लागत आहे. यासाठी जखमी बिबट्याच्या मदतीला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र पुढे येऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. अशातच अपघातात चारही पाय निकामी झालेला बिबट उपचारानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करायला लागला...
'माणिकडोह बिबट निवारा केंद्र' च्या मदतीने बिबटला मिळाले पुनर्जीवन - treament
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी येथे महामार्गावर पाच महिन्याच्या बिबटचा अपघात झाला होता. या अपघातात बिबटचे चारही पाय निकामी झाले असताना या बिबट्यावर 'माणिकडोह बिबट निवारा केंद्रात' उपचार सुरु करण्यात आले. physiotherapy व massage ट्रीटमेंट सुरू केली. पहिले पंधरा दिवस ती बसायला लागली, नंतर आठ दिवसात उभं राहायला लागली. नंतर चालायला, पाळायला लागली, व नंतर उडी मारायला लागली.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी येथे महामार्गावर पाच महिन्याच्या बिबटचा अपघात झाला होता. या अपघातात बिबटचे चारही पाय निकामी झाले असताना या बिबट्यावर 'माणिकडोह बिबट निवारा केंद्रात' उपचार सुरु करण्यात आले. physiotherapy व massage ट्रीटमेंट सुरू केली. पहिले पंधरा दिवस ती बसायला लागली, नंतर आठ दिवसात उभं राहायला लागली. नंतर चालायला, पाळायला लागली, व नंतर उडी मारायला लागली. तब्बल तीन महिन्यांपर्यत या बिबटवर उपचार करण्यात आले. त्यानंतर बिबट शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर त्याला जंगल परिसरात सोडण्यात आले.
माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांवर उपचार करून त्यांच्या भावना व वेदना समजून घेऊन आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे बिबट्यावर उपचार करण्यात आले. माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या संपूर्ण टीमने या बिबट्याची तीन महिने अगदी डॉक्टर आणि पेशंट या नात्यातून सेवा केली. आणि तीन महिन्यानंतर हा बिबट शारीरिकदृष्ट्या सक्षम झाला. आता परत हा बिबट मुक्त संचार करेल याचा आनंद तर दुसरीकडे ती आपल्याला सोडून जाण्याचे दुःख या टिमवर होतेच. दरम्यान जो प्राणी अपघातातुन मरण्याच्या दारात होता, तो आज उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करतोय हेच माणसातील माणुसकीचं उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल.