महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rain In Pune District: 'हे' पाच तालुके वगळता पुणे जिल्ह्यात शाळांना 14 ते 15 जुलै'पर्यंत सुट्टी - पुणे जिल्ह्याता कुठे जास्त पाऊस आहे

सध्या राज्यभरात पाऊस सुरू आहे. ( Rain In Pune District ) दरम्यान, पुणे जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यातच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, शाळांना 14 आणि 15 जुलै पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात पाऊस
पुणे जिल्ह्यात पाऊस

By

Published : Jul 13, 2022, 8:06 PM IST

पुणे - प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात (१४ व १५ जुलै)रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला आहे. जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील (१२ वी)पर्यंतच्या सर्व शाळांना (१४ जुलै ते १६ जुलै)पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश ( Rain In Pune District ) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे - अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी (१२ वी)पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. ( Schools In Pune District Will Be Closed ) तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांना काही समस्यांचा सामना करावा लागणार - मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अद्याप उसंत घेतलेली नाही. त्यातच हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिक चिंतेत आहेत. सध्या अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यादरम्यान नागरिकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

खोलगट परिसरात पाणी साचण्याच्या घटना - पुणे शहर, जिल्हा तसेच घाट माथ्याचा परिसर हा रेड अलर्टमध्ये आहे. त्यामुळे घाटमाथ्याच्या ठिकाणी पुढील काही दिवस जाऊ नये. शहर परिसराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न त्याचबरोबर रस्त्याकडेची झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. खोलगट परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडणार आहेत. वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याबद्दलही काळजी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

हेही वाचा -बदल्यांचं घोंगडं भिजतच; या आठवड्यात तरी बदल्या करा, शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details