पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुणे जिल्ह्यात सुरु असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्यावर पक्षप्रवेशाची जेव्हा वेळ येईल त्यावेळी राजकारण सोडुन देईल. मात्र, भाजपात जाणार नाही", असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे.
राजकारण सोडुन देईल पण भाजपात जाणार नाही - दिलीप वळसे पाटील - दिलीप वळसे पाटील भाजप प्रवेश
"माझ्यावर पक्षप्रवेशाची जेव्हा वेळ येईल त्यावेळी राजकारण सोडुन देईल. मात्र, भाजपात जाणार नाही", असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे.
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे भाजप प्रवेश सत्र सुरु आहे. यामध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे तर, काही जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये पुण्यातून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा रंगत होती.
दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनी झाली होती. तेव्हापासुन वळसे पाटील हे शरद पवारांचे जवळचे सहकारी आहेत. एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व म्हणून वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 'माझ्या राजकारणाची सुरुवातही राष्ट्रवादी आणि शेवटही राष्ट्रवादीच' अशा शब्दात त्यांनी पक्षासोबतची निष्ठा बोलून दाखवली.