पुणे- चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना शहरातील महंमदवाडी परिसरातील वाडकर मळ्यात घडली आहे. संगीता श्रीकांत चव्हाण (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी पती श्रीकांत कमाल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पती फरार - महंमदवाडी पुणे
श्रीकांत रविवारी रात्री दारू पिऊन घरी आला आणि त्यांच्यात परत कडाक्याचे भांडण झाले. याच वादातून श्रीकांतने संगीताच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला आणि पसार झाला.
चव्हाण दाम्पत्य हे मूळचे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील आहेत. दोघेही पुण्यात मजुरीचे कामे करतात. महंमदवाडी येथील लेबर कॅम्पमध्ये ते राहत होते. श्रीकांत चव्हाण हा नेहमी संगीताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते.
श्रीकांत रविवारी रात्री दारू पिऊन घरी आला आणि त्यांच्यात परत कडाक्याचे भांडण झाले. याच वादातून श्रीकांतने संगीताच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला आणि पसार झाला. दरम्यान रात्री २ वाजता वानवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संगीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तर पसार झालेल्या श्रीकांतचा शोध सुरू आहे.