पुणे (पिंपरी-चिंचवड)- मंत्रालयात उच्च पदस्थ एका व्यक्तींने पत्नीसोबत जबरदस्ती करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. आणि मंत्रालयात शासकीय अधिकारी असलेल्या पतीविरोधात तक्रार दिली.
मंत्रालयातील उच्च पदस्थ व्यक्तीचा पत्नीवर बलात्कार; गुन्हा दाखल - पोलीस उपनिरीक्षक एच.एस.सोळुंके
मंत्रालयात उच्च पदस्थ एका व्यक्तींने पत्नीसोबत जबरदस्ती करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 31 वर्षीय महिला घरात असताना तिचा पती, काही महिला आणि इतर दोन पुरुष घरात शिरले. तेव्हा, पीडित महिलेच्या भावाने पोलिसांना संपर्क साधण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यावेळी आरोंपीनी मारहाण करून शिवीगाळ करत विनयभंग केला, असं तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, आरोपी पतीने दुसऱ्या दिवशी येऊन पीडितेसोबत जबदस्ती करत बलात्कार केल्याचं देखील तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीत घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एच.एस.सोळुंके हे अधिक तपास करत आहेत. संबंधीत आरोपी हा मुंबई मंत्रालयात उच्च पदस्थ असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.