पुणे- लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर करण्यास सांगणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
कृत्रिम साधनाने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पती विरोधात पुण्यात गुन्हा दाखल - crime
लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर करण्यास सांगणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पीडित २८ वर्षीय महिलेचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सत्यनारायणाची पूजा झाली. मात्र, त्या दिवशी पती आणि पत्नी यांच्यात शारीरिक संबंध झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी दोघे एकत्र आले तेव्हा पती घाबरलेल्या अवस्थेत होता. पत्नीने धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पतीने पत्नीला आपण अश्लील व्हिडिओ पाहू त्यानंतर शारीरिक संबंध ठेऊ, असे सांगितले. यावर पत्नीने व्हिडिओ पाहण्यास नकार दिला. पतीने स्पष्ट सांगत माझ्यात प्रॉब्लेम असून आपण कृत्रिम साधनाचा वापर करून शारीरिक संबंध ठेऊ असे म्हटले. यावर पत्नीने नकार दिला, पत्नीचे न ऐकता पतीने बळजबरी करून कृत्रिम साधनाचा वापर करून पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केला.
हा सर्व प्रकार सासू आणि सासरे यांना सांगितला असता हे कोणाला सांगू नकोस आपली बदनामी होईल, असे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. पीडित विवाहित महिला माहेरी आल्यानंतर संबंधित घटना आई-वडिलांना सांगून भोसरी पोलिसात तक्रार दिली. पतीशी विवाह लावून माझी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित गुन्हा मूळ गावी असलेल्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.