पुणे: ओशो भक्तांमध्ये माळेच्या महत्त्वाबद्दल विचारले असता याबाबत स्वामी चैतन्य कीर्ती यांनी सांगितले की, ओशो यांनी मनाली येथे नवसन्यास आंदोलन जेव्हा सुरू केले तेव्हा त्यांनी हे माळा असे नाव दिले. यात 108 मनके असून हे स्मरण करण्यासाठी आहे. तसेच ध्यानाची 108 विधी आहेत. त्याचबरोबर यात एक धागा आहे, जो याला सांभाळून ठेवतो. तो साक्षी भावच स्मरण देत असतो. यात 108 विधी काहीही असू शकतात. या माळेमध्ये ओशो यांचे चित्र आहे. भक्त ओशो यांच्या समोर संन्यास घेतात. विशेष म्हणजे या माळेचे एक वैशिष्ट्य असे आहे की माळ हे ओशो भक्त असल्याचे प्रतीक आहे.
नवं संन्यास अकादमी सुरू:आज काही लाखो लोकांनी त्यांच्या उपस्थितीत माळा घालून संन्यास घेतला आहे. तर काहींनी संन्यास घेतलेल्या लोकांकडून माळ घालून संन्यास घेतला आहे. ओशो हे विदेशातून भारतात परत आल्यावर त्यांनी 1989 मध्ये नव संन्यास अकादमी सुरू केली. या माध्यमातून मा झरीन आणि मा आविरभाव यांनी संन्यास देण्याचे काम सुरू केले आहे. एकूणच ओशो भक्त आणि माळ यांचे महत्त्व आहे.