महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कीर्तन करायचं की शेती, हा ज्याचा त्याचा प्रश्न ; मात्र 'त्यांनी' महिलाबाबत अपमानास्पद बोलू नये' - Bhumata Brigade President

कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी, मागील काही दिवसांच्या प्रकारामुळे आपण त्रासलो आहोत. त्यामुळे आता डोक्यावरील फेटा उतरवून शेती करतो, असे वक्तव्य एका जाहीर कीर्तनात केले होते000.

nivrutti maharaj indorikar and trupti desai
निवृत्ती महाराज इंदोरीकर-तृप्ती देसाई

By

Published : Feb 16, 2020, 6:19 AM IST

पुणे - कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी, मागील काही दिवसांच्या प्रकारामुळे आपण त्रासलो आहोत. त्यामुळे आता डोक्यावरील फेटा उतरवून शेती करतो, असे वक्तव्य एका जाहीर कीर्तनात केले होते. याबाबत बोलताना भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी, कीर्तन करायचे की शेती, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, त्यांनी महिलांबाबत अपमानास्पद बोलू नये, असे म्हटले आहे.

भुमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...'कीर्तनातून 'निवृत्ती'? आता फेटा उतरवून करणार 'शेती'

आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु शेती करताना तरी इंदोरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे. त्यांनाही जर अपमानास्पद बोलाल तर स्वतःच्या शेतातही काही दिवसांनी काम करता येणार नाही. अशी तुमची गत होऊ शकते, अशी टीका केली आहे.

तसेच आपल्याला येणाऱ्या धमक्या आणि आपल्यावर होणारी अश्लील शेरेबाजी, हे तुमच्याच प्रबोधनामुळे घडलेली लोक करत असावीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details