पुणेमहाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह गौरीचे सुद्धा आगमन jyeshtha gauri aavahan होते. गौरी पूजन Jyeshtha Gauri Poojan महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात.अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला गौरी पूजन किंवा ग्रामिण भाषेत महालक्ष्म्या असे म्हटले जाते. यंदा ३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व ४ सप्टेंबर गौरी पूजन केले जाणार आहे. ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन Gauri immersion आहे.
पंचांगानुसार गौरी पूजन तिथी Jyeshtha Gouri Puja Tithi गौरी आवाहन तारीख,शनिवार 3 सप्टेंबर रात्री 10 वाजून 56 मिनिटांपर्यंत ,ज्येष्ठा गौरी पूजन 4 सप्टेंबर रोजी तर गौरी विसर्जन सोमवारी 5 सप्टेंबर रात्री 8वाजून 05 पर्यंत आहे. गौरी पूजनाची पद्धत महाराष्ट्रात प्रत्येक गावानुसार वेगवेगळी आहे. काही घरांमध्ये तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांच्यावर गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून मग पूजन केले जाते. तर काही घरांमध्ये मातीच्या मूर्ती रूपात गौराईचे आगमन होते. काही भागांमध्ये हंड्यातून धान्य भरून त्या हंड्यांना साडी चोळी नेसवून दागदागिने घालून वर देवीचा मुखवटा लावला जातो. एकूणच निसर्गाच्या विविध रूपांमधील शक्तीचे पूजन हे गौरी पूजेचे औचित्य असते. महाराष्ट्रात गौरी पूजनाच्या दिवशी गौराईचा आवडीचा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी माहेरवाशिणी व घरातील बहिणी, शेजारपाजारच्या मैत्रिणी एकत्र येऊन गौरीचे जागरण करतात. यंदा पाच दिवसांच्या गणपतींसह गौरीचे ५ सप्टेंबरला विसर्जन होणार आहे.