पुणे- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्त मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या २ ते ३ दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱया नागरिकांना पर्यटनाला न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
सावधान ! पर्यटनाला जाताय; जाणून घ्या हवामान खात्याचे म्हणणे... - RAHUL wagh
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील विविध भागात येत्या २ ते ३ दिवसांत मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे. यामुळे पर्यटनांकरता पर्यटकांना न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.
मागील २४ तासांच राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. पुणे शहर आणि परिसरातही गेल्या ४८ तासात चांगला पाऊस झाला असून येत्या २४ तासात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवस राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून उत्तर कोकण, मुंबई शहर आणि उपनगरे, पुणे, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी, मुंबई शहर आणि उपनगरे, घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.