महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Uday Samant : उच्च व तंत्र शिक्षणामध्ये कृषीच्या समावेशासाठी प्रयत्न करू : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत - Agriculture Subject In Higher Education

शेतीच्या शिक्षणाचा उच्च व तंत्र शिक्षणामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ( Agriculture Subject In Higher Education ) माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ( Minister Uday Samant ) दिली. बारामती येथे सुरु असलेल्या कृषी सप्ताहामध्ये ते बोलत होते.

उदय सामंत
उदय सामंत

By

Published : Feb 13, 2022, 4:53 PM IST

बारामती : बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान ( Agriculture Technology In Baramati ) पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे. कोकण विभागासाठी येथील माशांची शेती तसेच बांबू उत्पादनापासून तयार होणाºया वेगवेगळ्या वस्तू उपयोगाच्या आहेत. अ‍ॅग्रीकल्चरलमधील तांत्रिक गोष्टी माझ्या विभागाकडे बसतील का? शेती शिक्षणाबाबत उच्च तंत्र शिक्षणामध्ये काही तरतुदी करता येतील का? ( Agriculture Subject In Higher Education ) याबाबत आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षणामध्ये कृषीच्या समावेशासाठी प्रयत्न करू : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

१२ वी बाबत लवकरच निर्णय

बारामती येथे सुरू असलेल्या कृषी सप्ताहास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, १२ वी आणि सिईटी बाबत आम्ही एक समिती नेमली होती. यासमितीचा अहवाल आला आहे. यामध्ये १२ वीचे मार्क आणि सिईटीचे मार्क ५०-५० टक्के करता येतील का यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकच याबाबत निर्णय होईल. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांवर असलेला सिईटीचा ताण कमी करता येऊ शकेल. कोरोनाच्या संकटतून आपण बाहेर पडत आहोत. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वीच्या परिक्षांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

कोणत्या भाऊचं ऐकू नका..

दहावी-बारावी हे करिअर घडवण्याचे वय आहे. या वयात कोणत्या भाऊचं ऐकू नका. आपल्या पालकांचे व शिक्षकांचेच ऐका, असा सल्ला उदय सामंत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला. कोणाच्या तरी आवाहनाला बळी पडून विद्यार्थ्यांनी स्वत:च्या करिअर परिणाम करू नये. वेगवेगळी नावे विकास पाटक सारख्या व्यक्तीला जोडून उगीचच काही मंडळी त्यांचे महत्त्व वाढवतात, असेही सामंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details