पुणे -अमेरिकेत अशा प्रकारचा हल्ला होणे ही निंदनीय बाब असून या घटनेचा धिक्कार केला पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तर, चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजपाची, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या युतीच समर्थन केले जाऊ शकत नाही, ते चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमेरिकेत झालेला हल्ला हा निंदनीय -
प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा असू शकते. सगळ्यांना एकाच व्यक्तीचा विचार पटेल, असे नाही. त्यालाच आपण लोकशाही म्हणतो. त्यामुळे अमेरिकेत किंवा जगात अश्या प्रकारचे हल्ले होणे ही निंदनीय बाब आहे. या घटनेचा धिक्कार केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
परदेशात गेलेल्या प्रवाशांनी पळवाट काढली! -