पुणे (बारामती) - काँग्रेस महाराष्ट्रात कायम स्वबळाचा नारा देत आहे. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकाही आम्ही स्वबळावर लढवणार आहोत असे सातत्याने काँग्रेसने घोषणा केलेल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना विचारले असता, काँग्रेस करत असलेल्या स्वबळाच्या घोषणेत काहीही वावगे नाही. सर्वांना आपआपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी स्वबळाचा नारा दिला म्हणजे ते काही चुकीचे बोलत आहेत असे नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्र चालवत नाहीत असा खूलासाही पवार यांनी यावेळी केला आहे.
आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष नाही - शरद पवार - शरद पवार यांचा बारामती दौरा
काँग्रेस करत असलेल्या स्वबळाच्या घोषणेत काहीही वावगे नाही. सर्वांना आपआपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी स्वबळाचा नारा दिला म्हणजे ते काही चुकीचे बोलत आहेत असे नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
'विधासभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार'
आमच्या तीन पक्षांचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधान सभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते, आणि आताही काँग्रेसकडेच राहणार आहे. त्याबद्दल कोणत्याही पक्षाचे दुमत असता कामा नये. दरम्यान, विधानसभेत काँग्रेसचा अध्यक्ष असने आमच्या पक्षाला मान्य आहे. त्यामुळे या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे याबाबतचा काहीही गैरसमज असण्याचे कारण नाही, असही पवार म्हणाले आहेत. पक्ष म्हणून विचार वेगवेगळे असू शकतात. तसे ते आमचे विचार वेगवेगळे आहेत. मात्र, आम्ही सरकार एकत्र चालवतो. त्यामध्ये कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.