Raj Thackeray's in Pune : आम्ही देखील साहित्य प्रेमी पण.... पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी - कादंबरीकार विश्वास पाटील
तुमच्या सारखेच आम्ही देखील साहित्य प्रेमी (We are also lovers of literature ) परंतु आमची साहित्य वेगळी आहेत. तुमची साहित्य वाचावी अशी वाटतात पण आमची परवडत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी पुण्यात बोलताना केली आहे.पुण्यात आज पुण्यभूषण फाउंडेशन (Punyabhushan Foundation) चा दिवाळी अंक पारितोषिक कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
पुणे:पुण्यभूषण फाउंडेशन चा दिवाळी अंक पारितोषिक कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे (Senior writer Aruna Dhere) , लेखक आणि कादंबरीकार विश्वास पाटील (Novelist Vishwas Patil) , ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम (Actor Kishor Kadam) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली. अर्ध्या झाकलेल्या आणि पूर्ण उघड्या तोंडाच्या बंधू आणि भगिनींनो म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्याचबरोबर मी कधी मास्क वापरला नाही आणि राज्यावर आलेलं संकट लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना देखील केली.
आमची मराठी न परवडणारी
राज ठाकरे यांनी लेखिका अरुणा ढेरे यांच्यासह इतर लेखकांच्या मराठी भाषेच कौतुक करताना मराठी आम्ही देखील बोलतो पण आमची मराठी वेगळी आहे .आमची मराठी परवडत देखील नाही पण मराठी साठी जे करायचं ते आम्ही करतो अस ठामपणे सांगितल आहे.
लोकप्रतिनिधींना ठाकरी टोला
विधानसभेत झालेल्या एका प्रसंगाची आठवण प्रास्ताविकात करून देण्यात आली हा धागा पकडत राज यांनीत जे लोक बालभारती पाठ्यपुस्तकाच्या वर कधी वाचू शकले नाहीत असे लोक आज विधान भवनात बसले आहेत आसा जोरदार टोला लोकप्रतिनिधींना लगावला. आजकाल डे साजरे केले जातात, मात्र दंगलीच्या दिवशी आमचा हिंदु डे असतो नंतर कधी तरी मग आमचा भाषा डे असतो आणि मग आमच्या जातीचा दिवस येतो हे थांबवा अस आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे.