पुणे - येथील लोणावळा आणि मावळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने येथील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. सर्वत्र हिरवळ दिसत असून पर्यटक ठीक ठिकाणी गर्दी करत आहेत. लोणावळा येथे जाताना गर्दी आणि वाहतूकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, मावळमधील अंदर मावळ येथे माऊचा धबधबा आणि लालवाडीचा धबधबा सर्वांना आकर्षित करत आहे.
पावसाने पुण्यातील पर्यटनस्थळे फुलली, पर्यटकांना धबधब्यांचे आकर्षण
लालवाडी आणि माऊचा धबधबा हे दोन्ही ठिकाण शांतता आणि निसर्गरम्य असल्याने येथे पुणे-मुंबईमधील निवडक पर्यटक येत आहेत.
लालवाडी आणि माऊचा धबधबा हे दोन्ही ठिकाण शांतता आणि निसर्गरम्य असल्याने येथे पुणे-मुंबईमधील निवडक पर्यटक येत आहेत. सर्वत्र डोंगर रांगा आणि नयनरम्य निसर्ग असे या धबधब्यांचे रूप पाहायला मिळत आहे. लालवाडीचा धबधबा हा पर्यटकांना समोरून आणि मागच्या बाजूनेही अनुभवता येतो. यासाठी दोन्ही बाजूने हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
तर पर्यटनस्थळी तरुणांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची चिडचिड होते. मात्र, मावळ तालुक्यातील माऊचा धबधब्यावर तुम्ही सहकुटुंब मनसोक्त आनंद घेऊ शकता. कारण इथे हुल्लडबाजांना मज्जाव आहे. त्यात हा धबधबा तुम्हाला भुशी धरणाचाही अनुभव देतो. या दोन्ही ठकाणी शांतता असते आणि येथे निवडकच पर्यटक येतात. त्यामुळे सहकुटुंब धबधब्यांचा आनंद घेता येतो.