महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या सायंकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद - पिंपरी चिंचवड न्यूज

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

pimpri chinchwad
पिंपरीर चिंचवड

By

Published : Mar 31, 2021, 4:12 PM IST

पुणे : रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे उद्या (1 एप्रिल) पिंपरी-चिंचवड मधील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी भरून ठेवावे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर हे दुरुस्ती काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाने दिली आहे.

शुक्रवारीही पाणीपुरवठा होणार विस्कळीत -

शुक्रवारीही सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे.

ही होणार कामे -
मावळ तालुक्यातील पवना धरणामधून पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती, सेक्टर 23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक आणि पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनबाबत सध्या तरी निर्णय नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा -बाळासाहेबांच्या स्मारक भूमिपूजनावरून वाद; राज ठाकरेंसह विरोधी पक्षनेत्यांनाही निमंत्रण नाही

ABOUT THE AUTHOR

...view details