पुणे- अनेक हिंदी व मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरील आदिवासी कोळी समाजाचे वास्तव्य असलेल्या मुथाळने, कोपरे आणि मांडवे या परिसरातील दुष्काळाचे भीषण संकट उभे राहिले आहे.
चित्रपटात झळकणाऱ्या जुन्नर तालुक्यातील गावांची पाण्यासाठी वणवण - water problem
अनेक हिंदी व मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नगर-कल्याण महामार्गाच्या उत्तरेला उदापूर गावातून थोडे पुढे गेले की घाटमाथ्यावर मुथाळने गाव लागते. इथे पाण्याच्या शोधात महिलांची भटकंती सुरू असताना गावांमध्ये विहिरींच्या खोलीकरणाची कामे सुरू आहेत. जमिनीच्या भुगर्भातील काळापाषाण खडक तोडुन त्यात या नागरिकांचा पाण्याचा शोध सुरू झाला आहे. मात्र, पाणी नावालाच दिसतंय त्यामुळे दुष्काळी संकट आता या नागरिकांच्या पाटीलाच पुंजलय की काय असाही प्रश्न उभा राहिला आहे.
मुथाळने गावात देखील अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शाळांना सुट्टी असल्याने खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकली मुलेही पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. तर, मांडवे गावात पावसाळ्यात खळखळून दुथडी वाहणाऱ्या मांडवी नदीतल्या एका गढुळ डोहावरून महिला पाणी भरून नेत आहेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे गावात विविध आजार पसरल्याचे माजी महिला सरपंचांनी सांगितले. त्यामुळे सिंचनासाठी लाखो रुपये खर्च केले असतानाही ही गावे तहानलेली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.