बारामती (पुणे) - तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि त्याला वरूणराजाची मिळाली साथ, यामुळे यंदा बारामती तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तब्बल ५० टक्क्यांनी घटला आहे. तालुक्याच्या १ कोटी ५८ लाखांच्या टंचाई आराखड्याला जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे यंदा तालुक्याला दुष्काळाची झळ जाणवायची शक्यता कमी आहे.
विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून जलसंधारणाची कामे -
उन्हाळा म्हटल की बारामती तालुक्याच्या जिरायती भागाची तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागते. अगदी जानेवारी महिन्यापासून जिरायती भागातील दुष्काळी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतू मागील काही वर्षांमध्ये जिरायती भागात प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून जलसंधारणाची प्रचंड कामे झाली आहेत. ओढा खोलीकरण, पाझर तलाव, वळण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव या माध्यमातून तालुक्यात जलसाक्षरता मोठ्याप्रमाणात झाली. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमीटर एवढे आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडत विक्रमी आकडा गाठला.
१ कोटी ११ लाखांच्या निधीला मंजुरी -