पुणे -पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ओव्हर फ्लो झाले आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून धरणातून 2 हजार 200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात सुरू केला आहे. पवना नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षभरापासून पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. धरण भरले आता तरी पाणी कपातीचे संकट दूर होणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पवना धरण ओव्हर फ्लो; 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन करून पवना धरणाच्या सांडव्यातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पिंपरी-चिंचवडसह मावळमधील काही गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या 24 तासात या परिसरात 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन करून पवना धरणाच्या सांडव्यातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पिंपरी-चिंचवडसह मावळमधील काही गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या 24 तासात या परिसरात 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरण ओव्हर फ्लो झाले आहे. 1 जून ते आजच्या तारखेपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात 1 हजार 543 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात धरणाच्या पाणी साठ्यात 3.56 टक्के वाढ झाली तर, 1 जूनपासून आजतागायत धरणाच्या पाण्यात 62.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पवना धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणातील पाणी नदी पात्रात सोडले आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी सतर्क रहावे. नदी काठावरील सर्व साधन सामुग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. जेणे करून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी व जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.