महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर तिसऱ्या डोळ्याची नजर... - pune nashik highway

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्याने लॉकडाऊन कडक करत राजगुरुनगर पोलीसांकडुन पुणे-नाशिक महामार्गावर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जात आहे.

police
police

By

Published : Apr 3, 2020, 8:12 AM IST

पुणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु लागल्याने लॉकडाऊन कडक करत राजगुरुनगर पोलीसांकडुन पुणे-नाशिक महामार्गावर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जात आहे. ठिकठिकाणी पोलीस नाके लावण्यात आले असुन अत्यावश्यक सेवा वघळता वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे ठेवली जाणार आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर तिसऱ्या डोळ्याची नजर...

देशात लॉकडाऊन आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे राजगुरुनगर पोलिसांच्या माध्यमातून पुणे-नाशिक महामार्गावरुन येणाऱ्या नागरिकांना रोखण्यात येत आहे. नागरिकही रस्त्यावर येत नसल्याने रस्ते सामसूम झाले आहेत.मात्र अनावश्यक फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राजगुरुनगर पोलिसांनी कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसतानाही कायदा व सुव्यवस्था व कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडु नका अन्यथा पोलीस कारवाईचा सामना करावा लागेल, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details