महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhatghar Dam Pune ब्रिटिशकालीन भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गावांना सतर्कतेचा इशारा

पुण्यातल्या भोर तालुक्यात गेल्या 5 - 6 दिवसांपासून सुरू असलेल्या Discharge of water in nira river from Bhatghar Dam मुसळधार पावसाने Bhatghar Dam pune भाटघर धरण 100 टक्के भरले. धरणाच्या 45 स्वयंचलित दरवाजातून जवळपास 7 हजार 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग निरा नदी nira river pune पात्रात सोडण्यात आले आहे.

discharge of water in nira river from Bhatghar Dam
भाटघर डॅम शंभर टक्के भरले

By

Published : Aug 13, 2022, 7:46 AM IST

Updated : Aug 13, 2022, 12:17 PM IST

पुणेपुण्यातल्या भोर तालुक्यात गेल्या 5 - 6 दिवसांपासून सुरू असलेल्या Discharge of water in nira river from Bhatghar Dam मुसळधार पावसाने भाटघर धरण 100 टक्के भरले. धरणाच्या 45 स्वयंचलित दरवाजातून Bhatghar Dam pune overflow जवळपास 7 हजार 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर nira river pune असाच कायम राहिला तर, विसर्ग वाढविला जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाचे दृश्य

हेही वाचाDeepak Kesarkar उद्धव ठाकरेंची सैनिक नसलेली सेना आम्हीच खरी शिवसेना

गेल्या काही दिवसांपासून भाटघर धरण क्षेत्रात Bhatghar Dam Pune मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100 टक्के भरले आहे. या धरणातून भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे धरण भरल्याने या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

ब्रिटिशकालीन भाटघर धरणाची साठवन क्षमता 23.75 टीएमसी एवढी आहे. वेळवंड नदीच्या पात्रावर हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाचे काम 1927 मध्ये पूर्ण झाले. धरणावर असणाऱ्या वीज निर्मिती केंद्रात पाटबंधारे विभागाच्या इरिगेशन वॉटर बेसमधून वार्षिक 54.535 मिलियन युनिट वीज निर्मिती केली जाते. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून 7 हजार 200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचाLandslide on Railway Line Khandala खंडाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, सर्वच रेल्वे गाड्या उशिराने धावणार

Last Updated : Aug 13, 2022, 12:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details