महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी वारी विशेष : पुण्यनगरीत वारकऱ्यांची मालिश करून सेवा; हिंदु-मुस्लीम एकतेचे दर्शन - माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी

शहरातील पेठासह उपनगरातही राज्यभरातून आलेले वारकरी ठिकठिकाणी मुक्कामाला आहेत. या वारकऱ्यांच्या दिंड्या पारंपरिक नियोजनानुसार मुक्कामाला थांबल्या आहेत. देहू आणि आळंदीहून पायी प्रवास करत वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला येतात आणि पुढच्या मोठ्या पल्ल्याच्या वाटचालीसाठी सज्ज होत असतात.

वारकऱ्यांची मालिश करून सेवा करताना मुस्लिम बांधव

By

Published : Jun 27, 2019, 8:26 PM IST

पुणे- सध्या संपूर्ण शहर वारीमय झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये मुक्कामाला आहेत. यावेळी सहकारनगर मधील नवरात्र उत्सव समितीच्यावतीने हिंदु-मुस्लीम बांधवांनी एकतेचे दर्शन घडवत वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मसाज केला. गेल्या दहा वर्षांपासून येथे येणाऱ्या वारकऱ्यांची निवासव्यवस्था, भोजनाची व्यवस्था समितीच्यावतीने केली जाते.

वारी विशेष : पुण्यनगरीत वारकऱ्यांची मालिश करून सेवा; हिंदु-मुस्लीम एकतेचे दर्शन

शहरातील पेठासह उपनगरातही राज्यभरातून आलेले वारकरी ठिकठिकाणी मुक्कामाला आहेत. या वारकऱ्यांच्या दिंड्या पारंपरिक नियोजनानुसार मुक्कामाला थांबल्या आहेत. देहू आणि आळंदीहून पायी प्रवास करत वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला येतात आणि पुढच्या मोठ्या पल्ल्याच्या वाटचालीसाठी सज्ज होत असतात. वारीत अधिक चालणे होत असल्यामुळे काही वारकऱ्यांचे पाय दुखायला लागतात. त्यामुळे या वारकऱ्यांच्या पायांना मालिश करण्याची सेवा पुण्यात अनेक जण करतात. येथे वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून त्यांचे पाय चोळून देण्याचे काम उत्साहात केले जाते. म्हणून यावेळीसुद्धा सहकारनगर मधील नवरात्र उत्सव समितीच्यावतीने हिंदु-मुस्लीम बांधवांनी एकतेचे दर्शन घडवत वारकऱ्यांच्या पायाची तेल लावून मसाज केली.

माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी शहरात दाखल झाल्यानतंर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यास पुणेकरांनी गर्दी केली होती. यावेळी विविध मान्यवर, आमदार यांनीही दर्शन घेतले. तर दुसरीकडे विविध संस्थांनी वारकऱ्यांसाठी निवासव्यवस्था, भोजन, पायाला मसाज, चप्पलांची दुरुस्ती करणे, केश कर्तनालय अशा विविध सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करुन पुणेकर उत्साहाने या वारकऱ्यांची सेवा करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details