महाराष्ट्र

maharashtra

भटक्या कुत्र्याचा १४ जणांना चावा, जखमी ससून रुग्णालयात दाखल

By

Published : Aug 8, 2019, 11:59 PM IST

आज सायंकाळच्या सुमारास रांजणगाव गणपती येथे पिसाळलेले भटके कुत्रे सैरावैरा पळत होते. यावेळी त्याने १४ जणांना चावा घेतला. यात ४ लहान मुले, ५ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

भटक्या कुत्र्याचा १४ जणांना चावा

पुणे- शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हैदोस घालत १४ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यात ४ लहान मुले, ५ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या रांजणगाव आणि चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांची टोळकी फिरत आहेत. अनेक वेळा या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्लेही होत असताना आज सायंकाळच्या सुमारास रांजणगाव गणपती येथे पिसाळलेले भटके कुत्रे सैरावैरा पळत होते. यावेळी त्याने १४ जणांना चावा घेतला असून सर्व जखमींना रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर रेबीजचे इंजक्शन तातडीने द्यावे लागते. हे इंजेक्शन याठिकाणी उपलब्ध नसल्याने सर्व रूग्णांना पुण्यातील ससून रूग्णालयात हलवण्यात आले.

भटक्या कुत्र्याचा १४ जणांना चावा

उत्तर पुणे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लस मिळेना -
चाकण व रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. या परिसरात कुत्र्यांना कचराकुंडीच्या ठिकाणी खराब मांस मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या मांसाहारातून कुत्री पिसाळण्याच्या घटना वाढत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागात अशा घटना घडत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात "रेबीज" सेरीज इंजक्शन कधीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे रूग्णांना शहरी भागातील रूग्णालयात दाखल करावे लागत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details