पुण्यात घराची भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू; यात सुदैवाने बचावले दोन मुले - ओतूर
जुन्नर तालुक्यातील ओतूर मधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या बाजुस राहात्या घराची भिंत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. यात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात घरातच असणारी दोन चिमुकली मुले सुदैवाने बचावली आहेत. नजमा सलीम शेख असे मृत महिलेचे नाव आहे.
पुण्यात घराची भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू
पुणे- येथील जुन्नर तालुक्यातील ओतूर मधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या बाजुस राहात्या घराची भिंत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. यात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात घरातच असणारी दोन चिमुकली मुले सुदैवाने बचावली आहेत. नजमा सलीम शेख (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.