महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीचा जुना पैलवान भाजपच्या तालमीत, माजी आमदार बापू पठारे भाजपात - राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे भाजपात दाखल

वडगाव शेरीचे माजी आमदार राष्ट्रवादीचे बापू पठारे यांनी काल (सोमवार) रात्री उशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांसमवेत माजी आमदार बापू पठारे

By

Published : Oct 15, 2019, 10:16 AM IST

पुणे- पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांनी आपल्या समर्थक आणि कार्याकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचा पैलवान भाजपच्या तालमीत गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वडगावशेरीचे भाजपचे उमेदवार आणि आमदार जगदीश मुळीक यांनी बापू पठारे यांना पक्षात आणण्याची कामगिरी बजावली असून वडगावशेरी या राष्ट्रवादीच्या किल्ल्याला या निमित्ताने मोठे खिंडार पडले आहे.

हेही वाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे


मी, पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणली होती. मी माजी आमदार झाल्यापासून मला पक्षाने विचारले नाही. पाच वर्षात एकाही बैठकीला बोलवले नाही. माझ्यावर अन्याय केला. त्यामुळे मी भाजप मध्ये जात आहे. पवार कुटुबांचा मला नेहमी आदर आहे, असे माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सांगितले होते.

हेही वाचा - शिरुर शहरातून भाजप अध्यक्ष अमित शाहंची रॅली

ABOUT THE AUTHOR

...view details