पुणे: पुणे जिल्ह्यातील 167 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी तर 176 ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान ( Voting to elect Gram Panchayat members ) होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून काल संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रावरील पथके त्या त्या गावांमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील 221 पैकी 49 सरपंच बिनविरोध निवडून ( 49 Sarpanchs elected unopposed ) आले आहेत. तर 27 ठिकाणी सदस्य बिनविरोध झाले आहेत. ज्या ग्रामपंचायत निवडणुकी होत आहेत तेथे मोठे चुरस आहे. गावातील गट राजकीय पक्षाचे पाठबळ यामुळे अखेरच्या टप्प्यात निवडणुकांमध्ये रंगत वाढली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
Grampanchayat election : 176 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात आज मतदान - Group political party support
पुणे जिल्ह्यातील 167 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी तर 176 ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी मतदान ( Voting to elect Gram Panchayat members ) होत आहे. गावातील गट राजकीय पक्षाचे पाठबळ यामुळे अखेरच्या टप्प्यात निवडणुकांमध्ये रंगत वाढली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
गावाचे कारभारींचे भविष्य आज मतदान पेटीत होणार बंद :या निवडणुकांसाठी तालुका स्तरावर मतदान पथके आणि कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. एकूण 651 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण 1062 जागांसाठी हे मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ही देण्यात करण्यात आला आहे. गेले अनेक दिवस ग्रामपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्याचा, अर्ज छाननी करण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून निवडणुका जाहीर केल्यानंतर जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आल्या परंतु ज्या ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या नाहीत. त्यांच्यासाठी आज मतदान होत आहे. गावाचे कारभारी यांचे भविष्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.