महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 1, 2020, 1:23 PM IST

ETV Bharat / state

पुण्यातल्या कोथरूड भागात सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा

मतदार संघात एकूण एक हजार 202 मतदान केंद्रे आहेत. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रांवर लाईव्ह स्थितीवर व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. तसेच, निरीक्षकांचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघात यंदा जोरदार चुरस दिसून येत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ न्यूज
पुणे पदवीधर मतदारसंघ न्यूज

पुणे -सकाळपासून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदार संघात एकूण एक हजार 202 मतदान केंद्रे आहेत. यापैकी प्रशिक्षक मतदारसंघासाठी 367 मतदान केंद्रे आहेत. पुणे पदवीधर मतदार संघात 62 उमेदवार शिक्षक मतदार संघात आहेत. मतदारसंघात एकूण चार लाख 26 हजार 257 मतदार आहेत. तर, शिक्षक मतदारसंघासाठी 72 हजार 545 मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण 10 हजार 157 अधिकारी, कर्मचारी आहेत.

पुण्यातल्या कोथरूड भागात सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा

हेही वाचा -राजकीय दबावापोटीच 'बीएचआर'मधील गैरव्यवहाराच्या तपासाला विलंब; एकनाथ खडसे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत होत असून एकूण 62 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदारसंघात सर्वात जास्त मतदार पुणे शहरात आहेत. जवळपास दीड लाख मतदार पुणे शहरात असून कोथरूड विधानसभा मतदार संघात पदवीधर मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मतदान सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या कोथरूडमध्ये सकाळपासून मतदारांनी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, या मतदानाच्या निमित्ताने कोथरूड परिसरात सर्व बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील तांबे यांनी दिली आहे.

हेही वाचा -अन्यथा दुचाकीने दिल्लीत जाऊन आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रांवर लाईव्ह स्थितीवर व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. तसेच, निरीक्षकांचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघात यंदा जोरदार चुरस दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details