महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुख्यमंत्र्यांचे राज्यात विरोधकच शिल्लक नाही, हे वक्तव्य लोकशाहीचा अपमान' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

पुणे शहरातही अनेक योजना प्रलंबित आहेत. उड्डाणपुलाचा प्रश्न, 24 बाय 7 योजना, पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असून जनता अडचणीत आहे. मात्र, राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप विश्वजीत कदम यांनी केला.

विश्वजीत कदम, काँग्रेस नेते

By

Published : Oct 12, 2019, 10:17 PM IST

पुणे- राज्यात विरोधकच शिल्लक नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. देशात लोकशाही जिवंत आहे याचा विसर भाजपच्या लोकांना पडलेला दिसतोय, त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केला. ते पुणे जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी युती सरकारवर टीका केली.

विश्वजीत कदम, काँग्रेस नेते

यावेळी बोलताना कदम म्हणाले, एकीकडे राज्यात पूर परिस्थिती होती, तर दुसरीकडे राज्यकर्ते जल्लोष यात्रा काळात होते. या काळात जनतेला मदत मिळाली नाही. राज्य सरकार निष्क्रिय होते आणि याचा फटका या राज्यकर्त्यांना निवडणूकीत बसेल, असे विश्वजीत कदम म्हणाले.

हेही वाचा - मावळमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा

पुणे शहरातही अनेक योजना प्रलंबित आहेत. उड्डाणपुलाचा प्रश्न, 24 बाय 7 योजना, पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असून जनता अडचणीत आहे. मात्र, राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाहीत. पुणे शहरात 8 आमदार आणि 2 खासदार महापालिकेत असताना देखील पुण्याचे प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश आले आहे, अशी टीका कदम यांनी केली. तसेच जनता युती सरकारला निवडणुकीत धडा शिकवेल आणि राज्यात आघाडी चे सरकार येईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - ...आता फक्त शेती करून चालणार नाही, शेतीला व्यवसायासह नोकरीची जोड हवी - पवार

ABOUT THE AUTHOR

...view details