पिंपरी-चिंचवड: माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी लखनऊमध्ये केलेले वक्तव्य हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार यांनी लखनऊ येथे मंदिर आणि मशीद यांच्या ट्रस्ट संदर्भात वक्तव्य केले होते. राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्माण होऊ शकते तर मशिदींसाठी का नाही? असे पवार म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य दिशाभूल करणारे असून, यामुळे समाजात अशांती पसरेल, असे परांडे म्हणाले.